Wednesday, July 20, 2022

Meri Awaj bhi pehchaan hai ....!

मेरी आवाज भी पहचान है ...!!


स्वरसम्राग्नी लता, आशा, रफी आणि किशोर असे सिद्धस्थ दिग्गज असलेल्या सिनेसृष्टीत एक वेगळा आवाज घेऊन लोकांना भुरळ पडण्याची किमया अनेक गायकांनी केली. भूपिंदर सिंग हा त्यातला एक. मला वाटतं या दिगजांच्या संगीताच्या गोल्डन पिरियड मधल्या यादीतला हा शेवटचा गायक ठरेल असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. जयदेव, आर.डी , खय्याम यांच्या सोबत थोडीशीच गाणी  म्हणून या कलाकाराने आपली मने जिंकली ... त्याच्या आवाजाची जादू काही औरच ... त्याच्या गाण्यांची आठवण झाली कि मग त्याचा आवाज ऐकल्याशिवाय चैन पडत नाही असा माझा अनुभव आहे. 


१९८०च्या  दशकात दिल ढुंढता है फिर वही ... हे मौसम मधले डुएट  ऐकून  आम्हाला त्यावेळी वेड लागले होते तसेच काहीसे घरोंदा मधले दो दिवाने शेहर में हे गाणं ऐकून सुद्धा झाले होते. हि दोन्ही गाणी सॅड version मध्ये भूपिंदरच्या सोलो आवाजात आहेत ... त्यांची मजा तर वेगळीच आहे. त्यात गुलजारच्या शब्दांची खरी ताकद दिसते.तशीच ती किनाऱ्यामधल्या "नाम गुम जायेगा ..." या अजरामर गाण्यातून सुद्धा दिसते. मेरी आवाज हि पहचान है हि ओळ लता बरोबर शेकडो गाणी गाणारे किशोर किंवा रफीला न मिळता भूपिंदरला मिळावी ह्या योगायोगात त्यांनी स्वतःला धन्य मानले असावे ... खरंच त्याचे भाग्य थोर. 


काहीच वर्षांनी आणखीन एका भूपिंदरच्या गाण्याने आम्हाला असेच वेड लावले.  ते म्हणजे ...आहिस्ता आहिस्ता मधले खय्यामचे कभी किसीको मुक्कमल जहाँ नही मिलता ... हे गाणं. ह्या गाण्यात भूपिंदरची गाण्यातली सहजता लक्षात येते ... एका दूरदर्शनच्या कार्यक्रमात त्यांनी हे म्हटले होते ते युटूबवर सापडले त्याची लिंक सहारे करतोय  .... मजा घ्या ! आपल्या मूठभर गाण्यांनी मला तरी या गायकाने कधीच संपणार नाही इतका आनन्द दिला आहे आणि तोच मी तुमच्यासोबत शेअर करतोय. नमस्कार !!


https://youtu.be/ele3pNFcv_Y