राष्ट्रोन्नती !!
स्वातंत्रोत्तर काळातील हे पहिलेच काँग्रेसरहित दशक भारतवर्षाला प्राप्त झाले आहे. एवढेच नव्हे तर यापूर्वी या देशाला इतका डायनामिक पंतप्रधान ही कधी लाभला नव्हता. अर्थात ही गतिशीलता काही अंशी तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे आणि एकूणच नव्या सहस्रकात साऱ्या जगाच्या बदललेल्या मानसिकतेमुळे सुद्धा अपरिहार्य ठरते. त्यात काँग्रेसच्या राज्यकर्त्यांच्या आणि प्रामुख्याने मनमोहन सिंग यांच्या पार्श्वभूमीवर तर मोदिजींचा ठसा अधिकच ठळक जाणवतो. तशा प्रकारचे स्वागतही मोदिजींचे झाले.
कोरोनाच्या संकटकाळी मोदिजींचेच कणखर नेतृत्व आपल्याला लाभले हे एका दृष्टीने आपले भाग्यच म्हणावे लागेल असा विचार मनात येतो. इतर कोणताही राज्यकर्ता इतका परिणामकारक होऊ शकला असता की नाही असा प्रश्न सुद्धा पडतो. Of course with due respect to all State Chief Ministers and we people who have supported by being patient.
काही कठीण आणि अभूतपूर्व निर्णय घेऊन मोदिजींनी भारताची एक नवी प्रतिमा जगा समोर नेऊन ठेवली आहे किंवा त्या दिशेने वाटचाल तरी नक्कीच आहे. मला याचा एक हिंदू म्हणुन सार्थ अभिमान आहे.
मोदिजी संघर्षाने आपलं काम इतकं छान आणि प्रामाणिकपणे करता आहेत .... संघर्ष अशासाठी की एक देश चालवणे सोपे नाही आणि अशा पक्षातून नेतृत्व मिळाले आहे जो जातीय असल्याचा दावा या देशात पूर्णपणे नाकारताही येणार नाही.
मी तरुण असताना म्हणजे नव्वदच्या दशकात काँग्रेस म्हणजेच तेव्हाचे राज्यकर्ते हे अल्पसंख्यांकांचे म्हणजेच मुस्लिमांचे लाड पुरवत आहेत हे अगदी स्पष्ट दिसत होते. वास्तविक हा राज्यकर्त्यांवरचा द्वेष कुणावर व्यक्त करायचा हे माहित नसल्या कारणाने हा द्वेष सरळ सरळ मुसलमानांवर व्यक्त होऊ लागला. स्वातंत्र्याच्या काळाची बीजं होतीच आणि राज्यकर्त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी तो द्वेष रुजवूनही ठेवला.
आज मोदिजी खूपच छान आणि अविश्वसनीय काम करत आहेत. कुठेही कोणत्याही धर्माचा किंवा जातीचा अवमान करीत नाहीत. किंबहुना काही अभूतपूर्व निर्णय घेऊन भारताची वाटचाल ते कॉमन सिव्हिल कोड च्या दिशेने नक्कीच नेत आहेत. एवढेच नव्हे तर आज मोदिजी एक जागतिक नेता होण्याच्या मार्गावर आहेत. कोणतीही वायफळ चर्चा न करता मोदीजी जर ही किमया करू शकतायेत तर कृपया त्यांच्या भक्तांनी ते घेत असलेल्या प्रत्येक निर्णयाला धार्मिक रंग देऊन त्यांची अडचण वाढविण्याचे काम करू नये.
मोदीजींनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही ओढून-ताणून कशी हिंदू धर्मावर आधारलेली आहे आणि मुसलमान विरोधी आहे यात समाधान शोधू नका. यामुळे काही महत्त्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी करणं कठीण तर होतेच आहे पण राष्ट्रोन्नती चा वेगही कमी होतो आहे हे लक्षात घ्या. CAA चे काय चालले आहे ते बघतोच आहोत. तुमच्या अट्टाहासाचा परिणाम चिथवून अशांतता आणि नकारात्मकता पसरविण्याखेरीज दुसरा काहीच होत नाही.
आणि तो आपला धर्म कदापि नाही. किंबहुना असे केल्याने आपणच त्यांचा धर्म पाळू लागतोय, नव्हे काय?
हा देश मुसलमान रहित किंवा कोणताही इतर धर्मरहित व्हावा किंवा होऊ शकेल हा केवळ एक अनावश्यक भ्रम आहे. कृपया चिथवणे थांबवूया आणि सकारात्मकच राहण्याचा प्रयत्न करूयात.
सूज्ञास अधिक सांगणे न लागे असे म्हणतात ... अर्थात सूज्ञास .....बाकी तुम्ही ठरवा.
नमस्कार .
एक अभिमानी आणि अभ्यासू हिंदू - आनंद नरसुळे, मॅक्सरीच रिसोर्सेस (Maxreach Resources)
Please enter you comments and feedback below. Thank you.